गटेनबर्ग बायबल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गटेनबर्ग बायबल (४२-ओळींचे बायबल किंवा माझरिन बायबल) ही योहान्स गटेनबर्गने छापलेली लॅटिन भाषेतील व्हल्गेट बायबलची भाषांतरित आवृत्ती आहे.
प्रचलित समजानुसार गटेनबर्गने छापलेले हे पहिले पुस्तक आहे. वस्तुतः असे नाही. याआधी गटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती. तसे असले तरी या पुस्तकाच्या छपाईने गटेनबर्ग क्रांती अथवा छापील अक्षराच्या युगाची सुरुवात झाली हे खरे.