अनिल अवचट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अनिल अवचट | |
जन्म | १९४४ ओतूर, पुणे |
कार्यक्षेत्र | वैद्यक व्यवसाय(डॉक्टर), पत्रकार, लेखक, समाजसेवक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्दीचा काळ | १९६९ - चालू |
पुरस्कार | महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार |
पत्नी | सुनंदा अवचट |
अनुक्रमणिका |
[संपादन] ओळख
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आणि पत्रकार आहेत.
[संपादन] जीवन
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
डॉ. अनिल अवचट यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी सुनंदा यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणार्या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.
डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.
अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी,बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.
[संपादन] उल्लेखनीय
१. डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तक" म्हणून जाहीर केली आहेत.
२. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या सम्मेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
३. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
[संपादन] पुस्तके
- वेध
- पूर्णिया
- छेद
- वाघ्या मुरळी
- हमीद
- मोर
- आप्त
- गर्द
- धागे आडवे उभे
- धार्मिक
- माणसं
- कोंडमारा
- स्वत:विषयी
- अमेरिका
- संभ्रम
- कार्यरत
- छंदांविषयी
- प्रश्न आणि प्रश्न
- दिसले ते
- जगण्यातले थोडे
- मस्त मस्त उतार
- सृष्टीत...गोष्टीत
- Beyond Work- Visionaries From Another India, "कार्यरत" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN:8188251046)
- People, "माणसं" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN:8185569673)