दालन:सूर्यमाला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सूर्यमालासूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणार्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे १६५ नैसर्गिक उपग्रह, ३ शोधण्यात आलेले लघुग्रह (प्लुटोसकट), त्यांचे ४ उपग्रह तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, क्यूपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो. सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील गोष्टींचा समावेश होतो - सूर्य, ४ अंतर्गत ग्रह, लघुग्रहांचा पट्टा, ४ बाह्य राक्षसी वायू ग्रह व क्यूपरचा पट्टा. क्यूपरच्या पट्ट्यापुढे अतिशय छोट्या वस्तूंनी बनलेले कडे व शेवटी ऊर्टचा मेघ आढळतात. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. तीन शोधण्यात आलेले लघुग्रह म्हणजे प्लुटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस व क्यूपरच्या पट्ट्यातील एरिस. |
|||
संक्षिप्त सूचीसूर्य - बुध - शुक्र - पृथ्वी - मंगळ - गुरू - शनी - युरेनस - नेपच्यून. |
|||
विशेष लेखचंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते. |
|
|
---|
बुध • शुक्र • पृथ्वी • चंद्र • मंगळ |
लघुग्रहांचा पट्टा |
गुरू • शनी • युरेनस • नेपच्यून • प्लूटो |
क्यूपरचा पट्टा • ऊर्टचा मेघ |