मानस राष्ट्रीय उद्यान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील भारत-भूतान सीमेवरील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे येथील सोनेरी वानर व ढगाळ बिबट्या ज्याला इंग्रजीत Clouded Leopard असे म्हणतात. येथील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी हे माहेरघर आहे. या उद्यानाचे नाव येथील वाहणार्या मानस नदीमुळे पडले आहे. मानस नदी ब्रम्हपुत्रा नदीची एक प्रमुख उपनदी आहे.
या उद्यानाची स्थापना १९२८ मध्ये झाली व याचे क्षेत्रफळ ३६० किमी वर्ग इतके आहे. याची १९७३ मध्ये व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषणा झाली. १९८५ मध्ये युनेस्कोतर्फे या उद्यानाची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड करण्यात आली, मुख्य कारण म्हणजे केवळ येथेच आढळणारे प्राणी व पक्षी. राष्ट्रीय उद्यान असले तरी सीमेवर असल्यामुळे चोरट्या शिकारीचा तसेच दहशतवाद्यांचा उपद्रव खूप आहे.
[संपादन] प्राणी
वर नमूद केल्या प्रमाणे येथे आढळणारे सोनेरी वानर येथील मुख्य आकर्षण आहे त्याच बरोबर भारताचा प्रमुख व्याघ्रप्रकल्प असून भारतातील महत्त्वाच्या मार्जार कुळातील प्रजाती येथे आढळतात. वाघ, बिबट्या, ढगाळ बिबट्या व अनेक प्रकारच्या रानमांजरी ज्यातील सोनेरी मांजर जे अतिशय दुर्मिळ आहे. भारतातील मार्जार कुळातील सर्वात अधिक प्रजाती येथे आढळून येतात[१].
एकूण सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती येथे आढळून येतात, पक्ष्यांच्या ३८०, सरपटण्यार्या प्राण्यांच्या ५० प्रजाती येथे आढळून येतात. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये भारतीय हत्ती, भारतीय एकशिंगी गेंडा, रानगवा, रानम्हशी, बाराशिंगा, आसामी माकड, स्लो लोरिस अथवा लाजवंती, पाणमांजर, अस्वल, भेकर, सांबर, चितळ इत्यादी. सोनेरी वानरा बरोबरच, आसामी कासव व छोटे रानडुक्कर येथील वैशिट्य आहे.
[संपादन] संदर्भ
- ↑ आपली सृष्टी आपले धन भाग -४ सस्तन प्राणी, निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
|
|
---|---|
आग्रा किल्ला · अजिंठा लेणी · सांची येथील स्तूप · चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान · छत्रपती शिवाजी टर्मिनस · गोव्यातील चर्च व इतर इमारती · एलेफंटा गुहा · वेरूळ लेणी · फतेपूर सिक्री · चोल राजांची मंदिरे · हंपी · महाबलीपुरम · पट्टाडकाल · हुमायूनची कबर · काझीरंगा राष्ट्रीय उद्यान · केवलदेव राष्ट्रीय उद्यान · खजूराहो · महाबोधी मंदिर · मानस राष्ट्रीय उद्यान · भारतातील पर्वतीय रेल्वे · नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने · सह्याद्री पर्वतरांग · कुतुब मिनार · लाल किल्ला · भिंबेट्का · कोणार्क सूर्य मंदीर · सुंदरबन राष्ट्रीय उद्यान · ताज महाल |
|
---|
आंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुझा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगमाळ • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोल • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बंदीपूर • बांधवगड • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • राजीव गांधी • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली |