भारतीय रुपया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपयाच्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या.
भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे बनविल्या जातात. रुपया हा शब्द संस्कृत मधील रुपे (चांदी) या शब्दापासून आला आहे. २००५ साली बनवली जाणारी चलने (नाणी व नोटा) खालीलप्रमाणे आहेत:
[संपादन] नोटा
सध्या पाच रुपयांपासून १,००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत.
[संपादन] सध्या चलनात असलेल्या नोटा
महात्मा गांधी श्रेणी [1] | ||||||
---|---|---|---|---|---|---|
सुलट बाजूचे चित्र | मुल्य | आकार | मुख्य रंग | वर्णन | चलनात आल्याचे वर्ष | |
सुलट | उलट | |||||
५ रुपये | ११७ × ६३ मिमी | हिरवा | महात्मा गांधी | ट्रॅक्टर | इ.स. २००२ | |
१० रुपये | १३७ × ६३ मिमी | नारंगी-जांभळा | गेंडा, हत्ती, वाघ | इ.स. १९९६ | ||
२० रुपये | १४७ × ६३ mm | लाल-नारंगी | ताडाचे झाड | इ.स. २००२ | ||
Rs. 50 | १४७ × ७३ mm | जांभळा | भारतीय संसद | इ.स. १९९७ | ||
Rs. 100 | १५७ × ७३ mm | मध्यात निळा-हिरवा, कडेला खाकी | हिमालय | इ.स. १९९६ | ||
-- | ५०० रुपये | १६७ × ७३ mm | हिरवा-खाकी व पिवळा | दांडी यात्रा | इ.स. १९९७ | |
पिवळा | इ.स. २००० | |||||
१,००० रुपये | १७७ × ७३ mm | गुलाबी | भारताचे अर्थतंत्र | इ.स. २००० | ||
येथील चित्रे ०.७ पिक्सेल प्रति मिलिमीटर, या प्रमाणात चित्रित केलेली आहे. हे प्रमाण जगातील सर्व चलनी नोटांच्या बाबतीत लागू होते. |
[संपादन] नाणी
खालील चलने नाण्यांच्या रुपात वापरली जातात:
- ५ रुपये
- २ रुपये
- १ रुपया
- ५० पैसे
- २५ पैसे
- १० पैसे (हल्ली फार प्रचलित नाही)
|
|
---|---|
मध्य आणि उत्तर | अफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रुबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम |
पूर्व | मंगोलिया टॉगरॉग · चिनी युआन · हाँगकाँग डॉलर · जपानी येन · मकावनी पटाका · उत्तर कोरयीन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरयीन वोन |
आग्नेय | ब्रुनेई डॉलर · कंबोडियन रीयाल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियान रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपीयन पेसोल · सिंगापूर डॉलर · थाई बात · अमेरिकन डॉलर (पश्चिम तिमूर) · व्हिएतनामी दोंग |
दक्षिण | बांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकन रुपया |
पश्चिम आणि मध्यपूर्व | आर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · सायप्रॉइट पाउंड · इजिप्शियन पाउंड · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्राईली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ लिरा · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · तुर्कस्तानी नवा लिरा · संयुक्त अरब अमिराती दिनार · येमेनी रियाल |
|
---|