चिंटू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चिंटू | |
---|---|
जनक | चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर |
सद्य स्थिती / वेळापत्रक | चालू |
माध्यम | छापील |
प्रकाशक | सकाळ |
शैली | विनोदी |
चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे. काही दोन वर्ष लोकसत्ता मधे येत होता.
अनुक्रमणिका |
[संपादन] कथानक
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधुन मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणी खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैरया तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्याल नेहमी विरोध करतात.
[संपादन] पात्रे
[संपादन] पप्पा
चिंटूचे बाबा (वडिल).
[संपादन] आई
चिंटूची आई.
[संपादन] पप्पू
चिंटूचा सर्वात जवळचा मित्र. हा चिंटूला संकटात नेहमी मदत करतो. पण राजू हे एक खुप मोठे संकट आहे जे कुणालाच आवरता येत नाही.
[संपादन] मिनी
चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाण, परिक्षा आणी अभ्यास आवडतो. ती मनापासुन कविता करते परंतु तिच्या कंपुमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहित. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणी मिनीच बहुतेक वेळेस पटत नाही.
[संपादन] बगळ्या
कंपूतला बावळट. ह्याचे नाव त्याच्या उंच आकृतीमुळे पडले आहे.
[संपादन] राजु
राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकतवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहित, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करुन सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आल तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणी भरपूर मार खातो.
[संपादन] जोशी काकू
चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खुप त्रास होतो. जशेकी क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरिला गेलेल्या कैरया.