एरबस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एयरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय तौलूज (इंग्रजी Toulouse) फ्रांस येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम फ्रांस येथिल तौलूज व जर्मनी तील हँबुर्ग (इंग्रजी Hamburg येथे चालते. या कंपनीने एयरबस ए ३८० (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणी पृथ्वी-प्रदक्षिणा पुर्ण झाली आहे. सिंगापुर एयरलाइन्स ने या विमानाचे पहिले व्यावसायीक उड्डाण केले. ही कंपनी अनेक इतर कंपन्यांच्या सामाइयीकीकरणात होती त्यामुळे तीचे नाव आता एयरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे. या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत जसे, A300 दोन जेट इंजीने असलेले A330 तसेच चार इंजीनांचे A340 वगैरे.
एयरबस ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसर्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एयरबस बनवले आहे. पहिला क्रमांक बोइंग ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.