अँड्रु जॅक्सन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अँड्रु जॅक्सन (मार्च १५, इ.स. १७६७ - जून ८. इ.स. १८४५) हा अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता.
जॅक्सनचा अध्यक्षपदाचा कार्यकाल इ.स. १८२९ ते इ.स. १८३७ इतका होता. हा न्यू ऑर्लिअन्सच्या लढाईचा विजेता सेनापती व डॅमोक्रॅटिक पक्षाच्या स्थापकांपैकी एक होता. जॅक्सनने अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय पद्धति रुजवण्यात मोठा हातभार लावला.