See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
अँग ली - विकिपीडिया

अँग ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँग ली (ऑक्टोबर २३, इ. स. १९५४) हे ऑस्कर विजेते चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या चित्रपटांमुळे पाश्चात्य प्रेक्षकांना चिनी संस्कृतीचे एक वेगळे दर्शन घडले.


अँग ली

जन्म ऑक्टोबर २३, इ.स. १९५४
पिंगटुंग, तैवान
कार्यक्षेत्र अभिनय, पटकथालेखन, निर्मिती, दिग्दर्शन
राष्ट्रीयत्व तैवान
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू
प्रमुख चित्रपट सेन्स अँड सेन्सिबिलिटी

क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन ब्रोबॅक माउंटन

पुरस्कार ऑस्कर पुरस्कार

गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोल्डन ग्लोब पुरस्कार

पत्नी जेन लिन
अपत्ये

अनुक्रमणिका

[संपादन] ओळख

अँग ली यांचा जन्म तैवानमध्ये झाला. १९७५ मध्ये नॅशनल तैवान कॉलेज ऑफ आर्ट्स मधून पदवी घेतल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे उरबाना-शॅंपेन विद्यापीठात नाट्यदिग्दर्शनाची पदवी आणि न्यूयॉर्क विद्यापीठात चित्रपट निर्माणासंबंधी पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी काही पटकथा लिहील्या आणि एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९९३ मध्ये द वेडींग बँक्वेट या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल अँग ली यांना ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे नामांकन मिळाले आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटात गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. इथून त्यांच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

[संपादन] प्रवास

१९९२ मध्ये अँग ली यांनी पुशिंग हँड्स हा चित्रपट तैवानमध्ये दिग्दर्शित केला. या चित्रपटाची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. यानंतरचा १९९३मधला द वेडींग बँक्वेटही यशस्वी ठरला. हे दोन्ही चित्रपट अमेरिकेत स्थायिक झालेल्या तैवानवासियांवर होते. यानंतर १९९५ मध्ये अँग ली यांचा पुढचा चित्रपट प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका जेन ऑस्टीन यांच्या सेन्स अँड सेन्सिबिलिटी या कादंबरीवर आधारित होता. अस्सल ब्रिटीश मातीतला हा चित्रपट दिग्दर्शित करणे म्हणजे अँग ली यांच्यासाठी एक आव्हानच होते आणि ते त्यांनी यशस्वीपणे पेलले. या चित्रपटाला सात ऑस्कर नामांकने मिळाली आणि या चित्रपटातील नायिका एम्मा थॉम्पसन यांना सर्वोत्कृष्ट पटकथेबद्दल ऑस्कर पारितोषिक मिळाले. १९९९ मध्ये अँग ली यांनी जुन्या चिनी संस्कृतीचे दर्शन घडवणारा क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन दिग्दर्शित केला. उत्कृष्ट छायाचित्रण आणि थक्क करायला लावणारे विशेष दृक्परिणाम ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये होती. हा चित्रपट जगभर गाजला आणि याला चार ऑस्कर पारितोषिके मिळाली. २००५ मध्ये ब्रोबॅक माउंटन या चित्रपटाबद्दल अँग ली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल पुन्हा ऑस्कर मिळाले. २००७ मधला त्यांचा लस्ट, कॉशन हा चित्रपटही समीक्षकांची दाद मिळवतो आहे.

[संपादन] कारकीर्द

  • आयएमडीबीवरील लीची कारकीर्द[१]

नोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही

[संपादन] चित्रपट दिग्दर्शन

  • अ लिटल गेम (२००८)
  • लस्ट, कॉशन
  • ब्रोबॅक माउंटन
  • हल्क
  • सेन्स अँड सेन्सिबिलिटी
  • क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन

[संपादन] पटकथा लेखन

  • पुशिंग हँड्स
  • द वेडींग बँक्वेट

[संपादन] अभिनय

  • पुशिंग हँड्स
  • हल्क

[संपादन] निर्मिती

  • क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन

[संपादन] संदर्भ


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -