फायरफॉक्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मोझिला फायरफॉक्स (इंग्लिश:Mozilla Firefox) हा एक 'मोझिला कॉर्पोरेशन'ने विकसित केलेला इंटरनेट ब्राउझर सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. लोकप्रियतेच्या दृष्टीने फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा इंटरनेट ब्राउझर आहे व इंटरनेट एक्सप्लोररचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी समजला जातो. बऱ्याचवेळा फायरफॉक्ससाठी इंग्लिश FF संक्षिप्तरूप वापरले जाते. विनामूल्य उपलब्धता, सुरक्षितता हे फायरफॉक्सचे काही फायदे आहेत.
तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशनच्या 'गेको' 'लेआऊट इंजिन'चा (HTML Renderer Layout engine) वापर करतो. फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट_विंडोज, लिनक्स, अॅपल मॅक ओ.एस्. व युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या इतर काही ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालतो. फायरफॉक्सची सर्वात नवीन आवृत्ती 2.0.0.12 आहे, की फेब्रुवारी २००८ पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स 'मोझिला पब्लिक लायसन्स' ह्या परवान्याखाली उपलब्ब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्त्रोत (Source code) हा मोझिला पब्लिक लायसन्स (MPL) आणि जी.पी.एल्. (GPL) ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.[१]
फायरफॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय (tabbed brosing). हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोरर पेक्षा सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे