इंटरनेट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस् चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (बर्याच वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला 'महाजाल' हा शब्द वापरलेला आढळतो)
इंटरनेट हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अश्या प्रोटोकॉल्स (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धती)वर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्कस् नी बनलेले आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल), वर्ल्डवाईड वेब पेजेस् , लोकांशी गप्पा मारणं (चॅटिंग) इत्यादी.