अर्थशास्त्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला Economics म्हणतात.
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ऍडम स्मिथ यांच्या इ.स.१७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्ने, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यव्हार, प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यव्हार प्रश्नांबाबत माहिती देते.
काही प्रसिध्द अर्थशास्त्रन्य- किन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो.