क्रिकेट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड , ऑस्ट्रेलिया ,भारत ,पाकिस्तान ,वेस्ट ईंडिझ ,न्यूझीलँड ,दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश ,झिंबाब्वे, केन्या आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
असे समजले जाते की ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधील केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली.
सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला.
१९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिध्द झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली.
[संपादन] उद्देश
फलंदाजी करणारया संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेंव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पुर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हांच धाव घेतात. जेव्हां फलंदाज चेंडु सीमापार करतो तेव्हा सुध्दा धावा मिळतात ( सहा धाव जेव्हा चेंडु जमिनीला न लागता जातो, नाहितर चार धावा). ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते.
गोलंदाजी करणारया संघाचा उद्देश दुसरया संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येउ शकते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, एल.बी.ड्ब्ल्यु.,धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे (legal) १ षटक या प्रमाने खेळल्या जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे end बदलले जातात व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडु गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात.
प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ all out झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो.
जो संघ सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेट च्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपन्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.
[संपादन] क्रिकेटचे नियम
मेरिलबोन क्रिकेट क्लबने सर्व महत्वाच्या क्रिकेट खेळणार्या देशांशी विचारविनिमय करून बनवलेल्या ४२ नियमांनुसार हा खेळ खेळवण्यात येतो.
[संपादन] खेळाडू आणि अधिकारी
[संपादन] खेळाडू
प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. सर्व खेळाडूंना फलंदाज अथवा गोलंदाज असे म्हणतात. सहसा प्रत्येक संघात पाच ते सहा फलंदाज व पाच ते सहा गोलंदाज असतात. मैदानावर सर्व प्रमुख निर्णय संघाचा कर्णधार घेत आसतो. जो खेळाडू व्यवस्थित फलंदाजी व गोलंदाजी करतो त्याला अष्टपैलू म्हणले जाते.
[संपादन] पंच
मैदानावर दोन पंच असतात. एक पंच गोलंदाज ज्या यष्टी जवळून गोलंदाजी करत असतो तेथे उभा असतो तर दुसरा पंच क्षेत्ररक्षणाची जागा Square Leg ला उभा असतो. तिसरया पंचाला TV Umpire म्हणतात तर सामना अधिकारी सामना क्रिकेटच्या नियमांप्रमाणे खेळवला जातोय याची खात्री करतो.
[संपादन] मैदान
मैदान हे सहसा गोल अथवा अंडाकृती असते. सहसा मैदानाचा व्यास १३७ मी ते १५० मी पर्यंत असतो. एका दोरीच्या साह्याने मैदनाची सीमा मांडली जाते.
[संपादन] खेळपट्टी
[संपादन] क्षेत्ररक्षण
[संपादन] सामन्यांचे स्वरूप
[संपादन] नाणेफेक
सामना सुरू होण्यापुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करतात. नाणेफेक जिंकणारा कर्णधार सुरवातीला फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. सर्व प्रथम गोलंदजी
[संपादन] डावाचा अंत
एक डाव संपतो जेव्हा,
- दहा फलंदाज बाद होतात
- फक्त एकच फलंदाज बाकी आहे जो फलंदाजी करु शकतो.
- दुसरया संघाने पहिल्या संघापेक्षा जास्त धावा केल्या.
- ठरवलेले षटके टाकुन झाली.
- कर्णधाराने आपला डाव घोषित केला.
[संपादन] सामन्याचा कालावधी
सामन्यतह कसोटी सामने ३ ते ५ दिवस खेळवले जातात. दररोज कमीत कमी सहा तास खेळ होतो. दोन डावांन मध्ये मध्यांतर असते त्या शिवाय प्रत्येक डावात टी ब्रेक, ड्रिन्क्स ब्रेक असतात
खेळ चालु राहण्यासाठी पुरेसा प्रकाश असने जरुरी आहे.
[संपादन] फलंदाजी व धावा
[संपादन] फलंदाजी
फलंदाज आपल्या बॅटने चेंडु फटकाउन धावा काढतात. जेव्हा फलंदाज बॅटने चेंडु मारतो तेव्हा त्याला फटका (शॉट / स्ट्रोक) म्हणतात. फटक्यांना ते ज्या दिशेने खेळल्या गेले आहेत त्या प्रमाने नाव दिले गेले आहे. फलंदाज संघाच्या निती नुसार आक्रामक अथवा सावध फलंदाजी करतो. फलंदाज सहसा क्रमाने फलंदाजीस येतात. प्रथम येणारया दोन फलंदाजांना ओपनर म्हणतात.
[संपादन] धावा
एक धाव काढण्यासाठी फलंदाजाला चेंडु फटकाउन फलंदाजी न करणारया साथीदाराच्या जागी जाव लागते व त्याच बरोबर त्याच्या साथीदाराला त्याच्या जागी आवे लागते (पॉपिंग क्रिझ्च्या आतमध्ये).
[संपादन] अतिरिक्त धावा
[संपादन] गोलंदाजी व बळी
[संपादन] गोलंदाजी
गोलंदाज एका ठरावीक पध्द्तीने चेंडु फलंदाजाच्या दिशेने टाकतो व त्याला गोलंदाजीची पध्दत ( Bowling Action) म्हणतात. सहसा गोलंदाज चेंडुचा टप्पा खेळपट्टीवर टाकतो चेंडू उसळुण फलंदाजा कडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी पॉपिंग क्रिझच्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला नो-बॉल म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडु फलंदाजाच्या अवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला वाईड चेंडु म्हणतात. वाईड अथवा नो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखिल तकावा लागतो.
गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो. गोलंदाज सहसा दोन प्रकार्चे असतात (तेज गोलंदाज, फिरकी गोलंदाज)
[संपादन] फलंदाज बाद होण्याचे प्रकार
दहा वेगवेगळ्या पध्दतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नविन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद होतात तेव्हा एक डाव संपतो.
खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.
- झेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबाद्चे क्षेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांना हि दिल्या जाते. ( नियम ३२)
- त्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या टोकावरिल यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३०)
- पायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु बॅटला न लागता फलंदाच्या पायावर,पॅड्वर किंवा शरीरावर आदळतो तेंव्हा पंच चेंडु यष्टींन वर गेला असता कि नाही हे ठरवुन फलंदाजाला बाद देउ शकतो. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते.
- धावचीत - जेंव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडु मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे क्षेय कोणालाही दिले जात नाही.
- यष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडु त्याला चकवुन यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेंव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३९)
- हिट विकेट
- हॅन्डल्ड द बॉल
- हिट द बॉल ट्वाईस
- क्षेत्ररक्षणात अडथळा
- टाईम्ड आउट
[संपादन] प्रकार
क्रिकेटचे अनेक प्रकार व श्रेणी आहेत. आंतरराष्ट्रीय व्यावसायीक खेळाडु कसोटी क्रिकेट, एकदिवसीय सामने आणि २०-२० सामने खेळतात.
[संपादन] कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक प्रकार आहे व त्याची सुरवात १८७७ मध्ये झाली. पहिला कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघात १५ मार्च १८७७ ते १९ मार्च १८७७ दरम्यान खेळवण्यात आला. ह्या सामन्या साठी निकाल लागे पर्यंत खेळवला जाणार होता व ४ चेंडूचे एक षटक टाकले गेले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला. तेंव्हा पासून १८०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळवले गेले आहेत व १० संघ कसोटी खेळण्यास पात्र आहेत. संध्या हे सामने पाच दिवसात खेळवले जातात व प्रत्येक संघ दोन खेळ्या खेळतो व प्रत्येक षटक सहा चेंडूचे असते.
[संपादन] एकदिवसीय क्रिकेट
एकदिवसीय क्रिकेटला मर्यादित षटकांचे सामने किंवा इंन्स्टन्ट क्रिकेट असे सुध्दा संबोधले जाते. १९६३ साली ह्या क्रिकेट प्रकाराची सुरवात झाली. १९७१ साली इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौरयात पावसामुळे विस्कळीत झालेल्या तिसरया कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी एकदिवसीय सामना खेळवला गेला. हे सामने खुप लोकप्रिय आहेत.
[संपादन] २०-२० क्रिकेट
२०-२० सामने सर्व प्रथम इंग्लंड मधील कॉन्टी क्रिकेट मध्ये २००३ साली खेळवण्यात आले. सध्या हा प्रकार बरयाच देशात खेळावला जातो. पहिला २०-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड च्या दरम्यान २००४ साली खेळवल्या गेला. पहिली २०-२० आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा सप्टेंबर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिका येथे झाली. या स्पर्धांमधे भारताने अजिंक्यपद पटकावले.
[संपादन] प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम श्रेणी सामने हे सहसा महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अथवा राष्ट्रीय सामने असतात. ह्या सामन्यांचे स्वरूप साधारणपणे कसोटी सामन्यान सारखेच असते.
[संपादन] हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट सिक्सेस
[संपादन] महिला क्रिकेट
[संपादन] लिस्ट - अ आमने
[संपादन] क्लब क्रिकेट
[संपादन] इतर प्रकार
- इंडोर क्रिकेट
- फ्रेंच क्रिकेट
- बॅकयार्ड क्रिकेट
- क्विक क्रिकेट
- कॅची शुबी क्रिकेट
- ब्लाइंड क्रिकेट
- किलीकिटी
- शॉर्ट फॉर्म क्रिकेट
- विटी-दांडु
[संपादन] आंतरराष्ट्रीय संघटन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकिय संघटना आहे. ह्या संघटनेचे मुख्यालय दुबई मध्ये आहे. प्रत्येक देशाची एक क्रिकेट संघटना असते जी त्या देशात क्रिकेटचे आयोजन करते व संघासाठी खेळाडुंची निवड करते.
क्रिकेट खेळणारया देशांना तीन विभागात टाकलेले आहे. पहिल्या विभागात कसोटी खेळण्यास पात्र असलेले दहा संघ आहेत. दुसरया विभागात असोसिएट तर शेवटच्या विभागात एफिलिएट सदस्य देश असतात.
[संपादन] क्रिकेट मधील विक्रम
[संपादन] बाह्य दुवे
- क्रिक.इन्फ़ो(डॉट)कॉम - (cricinfo.com)
|
|
---|---|
आंतरराष्ट्रीय | कसोटी क्रिकेट · एकदिवसीय क्रिकेट · २०-२० क्रिकेट · हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट सिक्सेस · महिला क्रिकेट |
इतर | प्रथम श्रेणी क्रिकेट · मर्यादित षटकांचे सामने · लिस्ट - अ आमने · क्लब क्रिकेट |
सारखे | इंडोर क्रिकेट · फ्रेंच क्रिकेट · बॅकयार्ड क्रिकेट · क्विक क्रिकेट · कॅची शुबी क्रिकेट · अंध क्रिकेट · किलीकिटी · शॉर्ट फॉर्म क्रिकेट · विटी-दांडू |
|
---|
गोलंदाज · फलंदाज · यष्टिरक्षक · अष्टपैलू खेळाडू · क्षेत्ररक्षक · कर्णधार · नॉन-स्ट्राईकर फलंदाज · रनर · नाईट वॉचमन · बदली खेळाडू |
|
---|
फलंदाजी · गोलंदाजी · क्षेत्ररक्षण · यष्टिरक्षण · पंचगिरी · समालोचन |
|
---|
झेल · त्रिफळाचीत · पायचीत · धावचीत · यष्टिचीत · हिट विकेट · हँडल्ड द बॉल · हिट द बॉल ट्वाईस · क्षेत्ररक्षणात अडथळा · टाईम्ड आउट |
|
---|
खेळ · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ |
बेसबॉल/क्रिकेट/पेस्पालो/राउंडर्स/सॉफ्टबॉल/स्टूलबॉल · बास्केटबॉल/कॉर्फबॉल/नेटबॉल · बुझकाशी · कर्लिंग · हँडबॉल · हर्लिंग / कमोगी · कबड्डी · लॅक्रोसे · पोलो/वॉटर पोलो · अल्टिमेट · वॉलीबॉल/सेपाक टॅकर्वा |
फुटबॉल प्रकार : अमेरिकन फुटबॉल · फुटबॉल(सॉकर) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल · गेलिक · रग्बी लीग · रग्बी युनियन |
हॉकी प्रकार: बॅन्डी · ब्रूमबॉल · हॉकी · फ्लोवरबॉल · आइस हॉकी · इंडोर हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी · शीन्टी |